स्थापना : १९२०
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ
नोंदणी क्र. : ई ७१६५/७९ मुंबई

सामाजिक उपक्रम

Chinchpokli Sarvajanik Utsav Mandal  ·  समाजसेवा

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे श्री चिंतामणी व आई भवानीच्या कृपेने वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात उत्सवाच्या माध्यमातून उपक्रम राबवून सामाजिक जीवन व शैक्षणिक क्षेत्रात व आरोग्य विषयक कामात हातभार लावत आलेले आहे.

रक्तदान शिबीर

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त रविवार दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन बा. य. ल. नायर रुग्णालय, टाटा रुग्णालय, जे. जे. रुग्णालय, वाडिया रुग्णालय व के.ई.एम रुग्णालय या रक्तपेढ्यांच्या सहकार्याने करण्यात आले. सर्व रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात आली आणि सर्व रुग्णालयांच्या डॉक्टर्स, सहकारी व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला.

७४८रक्तदात्यांनी रक्तदान केले

शैक्षणिक/आरोग्य शिबीर

  • चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ व लायन्स क्लब, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर दिनांक २८ सप्टेंबर २०२५ या दिवशी आयोजित करण्यात आले होते.
  • अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांच्या मुलांच्या मदतीसाठी धाराशिव सोलापूर येथील सेलू, बोरगाव, पिंपळगाव, डोंगरेवाडी, वाणेवाडी, दारफळ या भागातील ज्या विद्यार्थ्यांपर्यंत कोणतीही मदत पोहोचली नव्हती, त्या प्रत्येक मुलापर्यंत कर्तव्यभावनेतून मुंबईहून शैक्षणिक साहित्याची मदत पोहोचविण्यात आली.
  • भुलेश्वर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेतील पीडित व जखमींना मंडळाच्या वतीने प्रत्यक्षात भेटून त्यांना आर्थिक मदत पोहोचविण्यात आली व या कठीण प्रसंगात चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ त्यांच्या पाठीशी आहे याची ग्वाही दिली.
  • मंडळाच्या १०७ व्या वर्धापन दिनानिमित्त, विविध सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या जीवन आनंद संस्था, नाना पालकर स्मृती समिती, संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट, बाल आशा ट्रस्ट, द वात्सल्य फाऊंडेशन या पाच सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत करण्यात आली.

राष्ट्रीय/धार्मिक सण

  • श्री शिव जन्मोत्सव सोहळा सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी ढोल ताशांच्या गजरात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात सहभागी किलबिल नर्सरीच्या विद्यार्थ्यांची वेशभूषा विशेष आकर्षण ठरली. संचलनात दिवंगत महादेव व्यायामशाळा, वेतोशी रत्नागिरी यांनी लाठीकाठी, दानपट्टा, ढाल - तलवार यांची प्रात्यक्षिके सादर केली.
  • हिंदू नूतन वर्षाचे स्वागत मंडळाचे कोषाध्यक्ष श्री. विकास सावंत यांच्या हस्ते मंगळवार दि. ३० मार्च २०२५ रोजी चिंतामणी सभागृहात गुढी उभारून करण्यात आले. तसेच गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान, लालबाग - परळ आयोजित हिंदू नववर्ष शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.
  • स्वातंत्र्य दिन / प्रजासत्ताक दिन मंडळाचे अध्यक्ष श्री राजन गंगाबाई रामचंद्र डिचोलकर यांच्या हस्ते व किलबिल नर्सरीच्या विद्यार्थी व पालकांच्या समवेत साजरा करण्यात आला.
  • विभागीय गोविंदा पथकांस शुभाशीर्वाद लाभण्यासाठी "चिंतामणी दहीहंडी उत्सव" शनिवार, दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला. गोविंदा पथकांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
२०२४
  • श्री शिव जन्मोत्सव सोहळा सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी ढोल ताशांच्या गजरात साजरा करण्यात आला. किलबिल नर्सरीच्या विद्यार्थ्यांची वेशभूषा विशेष आकर्षण ठरली. दिवंगत महादेव व्यायामशाळा, वेतोशी रत्नागिरी यांनी लाठीकाठी, दानपट्टा, ढाल - तलवार यांची प्रात्यक्षिके सादर केली.
  • हिंदू नूतन वर्षाचे स्वागत कोषाध्यक्ष श्री. अमिताभ कौसल्या दशरथ मेस्त्री यांच्या हस्ते मंगळवार दि. ९ एप्रिल २०२४ रोजी चिंतामणी सभागृहात गुढी उभारून करण्यात आले. तसेच हिंदू नववर्ष शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.

ग्रंथालय

वाचकांसाठी कथा, कादंबरी, नाट्य, चरित्र/आत्मचरित्र, धार्मिक, ऐतिहासिक, आयुर्वेदिक, शास्त्रीय, व्यवसाय मार्गदर्शन, इत्यादी आधारित पुस्तके ग्रंथालयात आहेत. तसेच वृत्तपत्र वाचनालय व अभ्यासिका हे उपक्रम वर्षभर सुरु असतात.

९७५०पुस्तके

आरोग्य केंद्र

आहारतज्ञ (Dietitian)डि. टी. श्रुती तुम्मा – न्यूट्रिशनिस्ट डाएट प्लानर, सुजोक थेरेपिस्ट, हिप्नॉसिस, रेकी
अस्थिव्यंग तज्ज्ञ (Orthopedic)डॉ. संकेत पाटीलसोमवार व बुधवार, सायं. ७ ते ८
बालरोग तज्ज्ञ (Pediatrician)डॉ. शिरीषकुमार बांबरकरसोम, बुध, शुक्र, सायं. ५ ते ७
त्वचारोग तज्ज्ञ (Dermatologist)डॉ. सुनील एच. मणियारमंगळवार, सायं. ५ ते ६
शल्यचिकित्सक (General Surgeon)डॉ. मुकुंद शिंदेशुक्रवार, सायं. ६.३० ते ७.३०
अ‍ॅक्युप्रेशर आणि मूळव्याध (Acupressure & Piles)डॉ. विनायक पुजारीमंगळ, गुरु, शनि, सायं. ३ ते ५
निदान पॅथॉलॉजी केंद्र (Pathology)सोमवार ते शनिवार, सकाळी ८ ते २रविवारी, सकाळी ८ ते १२

वरील वैद्यकीय सेवा माफक दरात वर्षभर राबविली जाते. महिन्याच्या पहिल्या गुरुवारी बॉटली बॉय कंपाऊंड केंद्र व मुंबई महानगरपालिका (सार्वजनिक आरोग्य खाते) यांच्या वतीने बालकांना पल्स पोलिओ डोस व इतर प्रतिबंधक लस दिल्या जातात.

किलबिल नर्सरी

मंडळाच्या वतीने नर्सरी वर्ग सुरु आहेत. किलबिल नर्सरी अंतर्गत आषाढी एकादशी, स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, बालक-पालक यांचा नृत्याविष्कार, दिवाळी, ख्रिसमस, मंडई देखाव्याचे सादरीकरण, मकर संक्रांत, प्रजासत्ताक दिन, क्रीडामहोत्सव, शिवजयंती, वार्षिक सहल, होळी, वार्षिक स्नेहसंमेलन हे उपक्रम राबविले जातात.