स्थापना : १९२०
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ
नोंदणी क्र. : ई ७१६५/७९ मुंबई
Chinchpokli Cha Chintamani
स्थापना १९२०

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ

मुंबई शहर हे कापड गिरण्यांचे बालेकिल्ला असलेले शहर म्हणून ओळखले जाते. ह्याच मुंबईमध्ये चिंचपोकळी, लालबाग, परळ व शिवडी हे विभाग जास्त करून कोकणातून आलेल्या मराठी मध्यमवर्गीय लोकांच्या वस्तीचा विभाग म्हणून ओळखला जातो.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रेरणेने चिंचपोकळी विभागात १९२० साली स्थापना झालेले "चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, मुंबई" हे सर्वत्र महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे यंदा १०७ वे वर्ष असून सार्वजनिक उत्सव मंडळामध्ये सर्वात मोठा विभाग लाभलेले मंडळ आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाला ५००० वर्गणीदार आहेत, तसेच या मंडळास १२ पदाधिकारी, १०४ कार्यकारणी सदस्य व १५०० - २००० सहाय्यक सदस्य आहेत.

पुढे वाचा

दर वर्षी प्रमाणे ह्याही वर्षी मंडळाने दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. तरी आपणास सर्वांनी विनंती आहे की आपण उत्स्फूर्त पणे सहभागी होऊन भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती.

पुढे वाचा

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे श्री चिंतामणी व आई भवानीच्या कृपेने वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात उत्सवाच्या माध्यमातून उपक्रम राबवून सामाजिक जीवन व शैक्षणिक क्षेत्रात व आरोग्य विषयक कामात हातभार लावत आलेले आहे.

पुढे वाचा

"चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, मुंबई" हे श्री चिंतामणी व आईभवानीच्या कृपेने गेली अनेक दशके सामाजिक बांधिलकी जपून आपल्या कार्याचा सर्वत्र ठसा उमटवत असून या पुढे देखील असेच कार्य करून सर्वांच्या सेवेसाठी कायम वर्षानुवर्षे असेच तत्पर राहील.

पुढे वाचा
१०७
वर्षे सेवा
५०००+
वर्गणीदार
१०४
कार्यकारणी सदस्य
२०००+
सहाय्यक सदस्य