नवरात्रौत्सव
Chinchpokli Chi Aai Bhavani · नवरात्री उत्सव २०२३

आगमन सोहळा
आईभवानीचा पाटपूजन सोहळा शनिवार दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी श्री चिंतामणी सभामंडपात पार पडला. तसेच आईभवानीचा आगमन सोहळा गुरुवार दि. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी ढोलताश्याच्या गजरात पार पडला.
घटस्थापना
भवानीमातेची घटस्थापना मंडळाचे उपाध्यक्ष श्री विकास सुमन कृष्णा सावंत यांच्या हस्ते व श्री दत्तात्रय शास्त्री यांच्या पौराहित्याखाली करण्यात आली. मूर्तिकार श्री प्रेम कदम यांनी आई भवानीची सुबक मूर्ती घडविली.
सांस्कृतिक कार्यक्रम
उत्सव कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले —
- २०-२० डबलबारीचा जंगी सामना (पुरुष / महिला)
- दशावतार, सुस्वर भजन, मंगळागौर, साई भजन
- रास गरबा
- आई भवानीचा गोंधळ
विशेष उपक्रम
किलबिल नर्सरी आयोजित बालक-पालक नृत्याविष्कार संपन्न झाला. विभागीय महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. तसेच विविध स्पर्धा व शैक्षणिक-स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
होम हवन व विसर्जन
अष्टमीला होम हवन व विजयादशमीला सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. आई भवानी माता विसर्जन मिरवणूक बुधवार दि. २५ ऑक्टोबर २०२३ रोजी उत्साहात पार पडली.
